ऋषी पंचमी हे भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वपूर्ण व्रत आहे. आपल्या पुराणांनमध्ये महिलांसाठी अनेक व्रत आणि त्यांचे माहात्म्य सांगितलेले आहे, त्यातील हे एक व्रत आहे. ऋषी पंचमी हे व्रत महिलांसाठी असून, हे व्रत केल्याने नकळत झालेल्या अनेक पापांचे निवारण होते. हे व्रत करण्यासाठी काय करावे आणि त्यासंबंधित संपूर्ण नियम व अटी आपण सविस्तर जाणून घेऊया.
सप्तऋषींची नवे- कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ
ऋषी पंचमी म्हणजे काय?
ऋषी पंचमी हे अतिशय महत्वाचे एक धार्मिक आणि पारंपरिक व्रत आहे, जे भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला येते. या दिवशी महिलांनी मासिक पाळीमध्ये नकळत झालेल्या चुकांचे निवारन होण्यासाठी देवता आणि सप्तऋषी यांची क्षमा मागून शुद्ध होण्यासाठी हे व्रत केले जाते.
पूर्वीच्या काळी मासिक पाळीमध्ये स्त्रिया बाजूला बसत. कुठलेही काम करायचे नाही आणि एका बंद खोलीत बसून राहायचे, एकत्रित कुटुंब असल्याने ते सर्व शक्य ही व्हायचे. परंतु, सर्वच महिलांना असे शक्य नव्हते. त्यामुळे आपल्याकडून मासिक पाळीत झालेल्या चुकांचे निवारण होण्यासाठी ऋषी पंचमी हे अतिशय व्रत महत्वाचे आहे.
ऋषी पंचमी व्रत कथा व ऋषी पंचमीचे महत्त्व
पौराणिक कथेनुसार असे सांगतात की, एका गावामध्ये ब्राम्हण दाम्पत्य राहत होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत. एक दीवर ब्राम्हण स्त्री ला मासिक पाळी आली तिने विटाळ असताना घरत स्वयंपाक केला व पतीला खाण्यास दिला. त्यामुळे तिला पाप लागले. पुढील जन्मात तिला कुत्रीचा व तिच्या नवऱ्याला बैलाचा जन्म मिळाला. आणि ते दोघे आपल्या मुलाच्याच घरी होते. त्यांचा मुलगा मात्र मोठा धार्मिक होता. पूजा पाठ, ब्राम्हण भोजन तसेच श्राद्ध पक्ष हि करत असे.
एक दिवस मुलाच्या घरी श्रद्ध होते, त्या मुलाने ब्राह्मणांना भोजनास सांगितले. खिरीचा स्वयंपाक बनवला. परंतु त्या खिरीच्या भांड्यामधे सापांनी गरळ ओतली आणि हे त्या कुत्रीने बघितले. खीर ब्राम्हणांनी खाली तर ते मारतील आणि मुलाला दोष लागेल म्हणून ती कुत्री त्या खिरीच्या भांड्याला जाऊन शिवली. हे तिच्या सुनेने बघितले आणि रागाने तिने चुलीतील जळते लाकूड कुत्रीला मारले. सुनेने ती खीर फेकून दिली आणि दुसरा स्वयंपाक बनविला. सर्वांचे भोजन झाले आणि सर्व खरकटे फेकून दिले कुत्रीला त्या दिवशी काहीच खायला दिले नाही.
रात्री बैलाजवळ येऊन बसली आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगितला. बैल तिला म्हणाला आपल्या मुलानी आज घातलेलेश्राद्धा व्यर्थ गेले, मलाही आज काहीच खायकल दिले नाही, नांगराला जुंपले, तोंड बांधले आणि मारले. बैल म्हणाल मागच्या जन्मी तू विटाळामध्ये घरत स्वयंपाक केला आणि तो मला खाऊ घातला त्यामुळे मला बैलाचा आणि तुला कुत्रीचा जन्म मिळाला आहे.
हे त्यांचे बोलणे त्यांच्या मुलाने ऐकले त्याला खूप पश्चाताप झाला मुलाने दोघांनाही खायला दिले. दुसऱ्या दिवशी चिंताग्रस्त होऊन मुलगा घोर अरण्यात गेला त्याला तिथे ऋषी भेटले आणि त्यानी मुलाला चिंतेचे कारण विचारले. मुलाने सर्व कथा ऋषीला सांगितली. आणि माझ्या आई वडिलांना मोक्ष कसा विचारले.
तेव्हा ऋषींनी त्या मुलाला ऋषीपंचमीचे व्रत करण्यास सांगितले. ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीने मुलाने ऋषीपंचमीचे व्रत केले त्या व्रताच्या पुण्याने त्या मुलाच्या आई वडिलांना मोक्ष मिळाला.
ऋषी पंचमी कशी साजरी करावी? | व्रत करण्याची पद्धत
या दिवशी प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आघाड्याच्या काड्यांनी दात घासावे. नदीवर जाऊन स्नान करून पूजा मांडावी. सात ऋषी, एक गणपती आणि एक अरुंधती अश्या नऊ सुपाऱ्या मांडाव्या. एका ताम्हनामध्ये तांदळावरती या सुपाऱ्या मांडाव्या आणि त्यांची मनोभावे पूजा करावी. सात पत्री, सात फुले, एक नारळ, आठ जानवे, एक पंच्या, नऊ खारका, नऊ खोबऱ्याचे तुकडे, नऊ बदाम, बांगड्या, २५ विड्याची पाने, गुळ, पंचामृत आणि अत्तर. हे सर्व साहित्य अर्पण करावे. पूजा झाल्यानंतर मनोभावे ऋषीपंचमीची कहाणी वाचावी.
ऋषी पंचमीचे नियम
- बैलाच्या कष्टानी तयार झालेले अन्न खाऊ नये.
- काही ठिकाणी म्हशीचे दूध पिले तर चालते.
- दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घराबाहेर न जाता आधी काहीतरी खाऊन उपवास सोडावा.
- अशी मान्यता आहे की उपवास सोडण्याच्या आधी कुत्र्याचे तोंड बघू नाये.
सप्तऋषी कोण होते आणि त्यांची नवे?
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाचे कुळानुसार गोत्र असते. प्रत्येकाचे गोत्र हे ऋषीपासून निर्माण झालेले असते म्हणून ऋषी आपले पूर्वज आहेत. त्यांच्याबद्दल कृतद्न्यता म्हणून हे व्रत केले जाते. त्यांची नवे पुढीलप्रमाणे…
सप्तऋषींची नवे- कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, स्त्रिऋषींची प्रतिनिधी म्हणून माता अरुंधतीची पूजा केली जाते.
- कश्यप- मरीची ऋषींचे पुत्र कश्यप हे सप्तऋषींमधील एक आहे.
- अत्री- ब्रम्हदेवांचेव मानसपुत्र अत्री यांच्या घरी श्री ब्रह्मदेव – चंद्र, श्री विष्णू – भगवान दत्तात्रय आणि शिव – दुर्वास या नावाने जन्म घेतला.
- भारद्वाज- देवगुरु बृहस्पती यांचे भाऊ उतथ्य यांचे पुत्र भारद्वाज.
- विश्वामित्र- प्रभू श्री राम हे विश्वामित्र यांना आपले गुरु मनात आणि गायत्री मंत्राचे द्रष्टे.
- गौतम- ब्रह्मदेवाचे पुत्र व माता अहिल्याचे पती. त्र्यांबकेश्वर येथे नकळत हातून गोहत्या झाल्याने त्या पापाचे निवारण करण्यासाठी तपश्चर्यने स्वर्गातून गोदावरी नदी धरतीवरआणली.
- जमदग्नी- जमदग्नी हे परशुरामांचे पिता आणि ब्रम्हर्षी होते.
- वसिष्ठ- प्रभू श्री रामाचें गुरु आणि महर्षी वेदव्यास यांचे पणजोबा.
हे सुद्धा वाचा;-
- छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- नागपंचमी- संपूर्ण माहिती, कथा, पूजा आणि का साजरी केली जाते?
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- आपण गणेश उत्सव का साजरा करतो? | गणपती का बसवतात?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- हरतालिकेचे महत्व काय?
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ( छावा ) – एक पराक्रमी निडर योद्धा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- बैलपोळा का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा आणि संपूर्ण माहिती
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती