Home Cultural India Events स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज : एक निडर, शूरवीर आणि पराक्रमी योद्धा ( छावा )
    EventsCultural India

    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज : एक निडर, शूरवीर आणि पराक्रमी योद्धा ( छावा )

    chhatrapati sambhaji maharaj

    छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. ते केवळ पराक्रमीच नव्हे, तर अत्यंत बुद्धिमान, बहुभाषिक आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारे महान योद्धा होते. त्यांना छत्रपती शिवरायांचा छावा असे देखील म्हणत.

    छत्रपती संभाजी महाराजांचे शिक्षण आणि शौर्य

    संभाजी महाराज हे संस्कृत, मराठी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये पारंगत होते. त्यांनी लहान वयातच युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण घेतले. छत्रपती संभाजी महाराजांनी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना “धर्मवीर” असेही संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 16 जानेवारी, 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

    मुघलांविरुद्ध संघर्ष

    छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब विरुद्ध ९ वर्षे सातत्याने संघर्ष केला. त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक निर्णायक लढाया जिंकल्या. त्यांनी बुर्ली, रामसेज, जिंजी आणि पन्हाळगड यांसारख्या अनेक किल्ल्यांवर मुघलांना मोठ्या प्रमाणात पराभूत केले.

    छत्रपती संभाजी महाराजांना कोणी मारले?

    औरंगजेबाने त्यांना कैद करून अमानुष अत्याचार केले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करण्याची सक्ती केली होती, परंतु त्यांनी ती धुडकावून लावली होती. संभाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचे बलिदान स्वराज्यासाठी एक प्रेरणादायी अध्याय आहे.

    छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष जगले?

    छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू ११ मार्च १६८९ रोजी झाला. छत्रपती संभाजी महाराज ३२ वर्ष जगले.

    छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा

    संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यामुळे हिंदवी स्वराज्य अधिक बळकट झाले. आजही ते हिंदवी स्वराज्याचे खरे रक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जातात.

    हे सुद्धा वाचा;-

    Related Articles

    nagpanchami
    EventsCultural India

    नागपंचमी माहिती | Nag Panchami Mahiti in Marathi

    नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या...

    गणेश चतुर्थी
    Cultural IndiaEvents

    गणेश चतुर्थी २०२५: तारीख व मुहूर्त

    सर्वांचे आवडते दैवत गणपती बाप्पाचे आगमन म्हणजेच गणेश चतुर्थी २०२५ मध्ये कधी...

    makar sankranti
    Cultural IndiaEvents

    मकर संक्रांतीचे महत्व | भोगी, संक्रांत आणि किंक्रांत

    मकर संक्रांत (makar sankranti) हा प्रेम संवर्धनाचा सण. नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात...

    dussehra
    Cultural IndiaEvents

    दसरा का साजरा केला जातो? पूजा विधी, कथा व संपूर्ण माहिती

    दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा...