पितृपक्ष, भाद्रपद महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष येतो. याच पितृपक्षाला श्राद्धपक्ष, महालय किंवा पितृ पंधरवडा असे देखील म्हणतात. आपले जे कुणी मृत पूर्वज आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, त्यांना मोक्ष मिळावा या साठी पूजा, श्राद्ध, तर्पण हे विधी करणे, पितरांना भोजन देणे, त्यांना संतुष्ट करणे हा यामागील हेतू आहे.
पितृ पक्ष म्हणजे काय?
पितृ पक्ष म्हणजे आपल्या धर्मशास्त्रानुसार या पितृपक्षामध्ये आपले सर्व पूर्वज आपल्या घरी अदृश्य स्वरूपात येतात. आपले सगळे व्यवस्थित चालू आहे का ते बघतात, आपण त्यांच्या मोक्षासाठी पूजा विधी करतोय का, ज्या तिथीला त्यांचे निधन झाले त्या तिथीला पितृपक्षामध्ये आपण त्यांना नैव्यद्य देतोय का हे बघतात. पितरांच्या मोक्षासाठी आपण हे सगळे विधी करतो हे बघून ते तृप्त होतात आणि त्यांना मोक्ष ( योग्य सद्गती ) प्राप्त होते.
पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद कृष्ण पक्षापासून सुरु होते आणि सर्वपित्री अमावसेला समाप्त होते.
भरणी श्राद्ध म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीचे चालू वर्षी निधन झाले आणि त्यानंतर पितृपक्ष आला तर अशा वेळी पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र येते तेव्हा त्या तिथीला त्या मृत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते.
अविधवा नवमी
अविधवा नवमी म्हणजे एखादी स्त्री मरण पावते परंतु तिचा पती जिवंत असतो. त्या स्त्रीला सुवासिनी जाणे असे म्हणतात. या स्त्रियांसाठी पितृ पक्षातील नवमी तिथीला श्राद्ध केले जाते त्याला अविधव नवमी किंवा अहेव नवमी असे म्हणतात.
सर्वपित्री अमावस्या
पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. आपले जे काही सर्व पित्र आहेत, ज्यांची मृत्यू तिथी आपल्याला माहित नसते अशा पितरांसाठी सर्वपित्री अमावासेला पूजा केली जाते व त्यांना नैवेद्य देऊन त्यांच्या मोक्षासाठी या अमावसेला प्रार्थना केली जाते.
पितृ पक्षात काय करावे?
आपल्या धर्मानुसार मेलेल्या पितरांचे श्राद्ध करणे आणि पितृपक्षामध्ये त्यांना तिथीनुसार भोजन नैवेद्य स्वरूपात देणे हे त्यांच्या वंशजांचे परम कर्तव्य आहे.
आपल्या पितरांच्या मोक्षासाठी त्यांच्या नावाने या पितृ पक्षामध्ये अन्न दान करावे, दान धर्म करावे. त्यांचे श्राद्ध, पिंड दान तसेच तर्पण ( पितरांना तृप्त करण्यासाठी केलेला विधी ) करावे.
या पितृपक्षामध्ये ब्राह्मणानं भोजन देऊन त्यांना दक्षिणा दिली जाते. पिंडदान व तर्पण देखील केले जाते.
पितृ पक्षात काय टाळावे?
- साखरपुडा, लग्न, गृहप्रवेश, नामकरण सोहळा यांसारखे शुभ कार्य टाळले जातात.
- तसेच नवीन वस्त्र, वस्तू खरेदी करणे टाळले जाते.
- मांसाहार, मद्यपान, कांदा-लसूण सेवन टाळले जाते.
पितृ दोष आणि उपाय
काही लोकांना पितृदोष असतो ज्यामुळे आपल्याला जीवनात खूप अडचणी येतात. पितृदोष म्हणजे आपले पितर अतृप्त असणे, त्यांना मुक्ती भेटलेली नसते. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांनी पितृ पक्षात विशेष श्राध्द करून ब्राह्मण भोजन व पिंडदान करावे. विशेषतः काशी, गया, त्र्यंबकेश्वर येथे पिंडदान केल्यास पितृ दोषाचे निवारण होते.
पितृपक्षामध्ये कोणाला अन्नदान करावे?
1. गाय- गायीला हिंदू धर्मामध्ये आईचे स्थान आहे, व तिच्यामध्ये पंचतत्वांपैकी पृथ्वी हे तत्व सामावलेले आहे असे म्हणतात. म्हणून पितृपक्षामध्ये गायीला अन्नदान करणे फार महत्वाचे मानले जाते.
2. कावळा- असे म्हणतात की कावळ्याला प्रेतात्मा दिसतात व आत्म्याने परवानगी दिल्याशिवाय कावळा घास घेत नाही असे म्हणतात. कावळ्याचा संबंध वायुतत्वाशी आहे. म्हणून कुठल्याही पिंडदानामध्ये कावळ्याला नैवेद्य देणे महत्वाचे मानले जाते.
3. कुत्रा- कुत्र्याला यमाचे दूत मानले जाते. पितृपक्षामध्ये कुत्र्याला भोजन देणे देखील अतिशय महत्वाचे मानले जाते.
4. मुंगी- मुंगीला पंचतत्वांपैकी अग्नीतत्वाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे पितृपक्षामध्ये मुंग्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते.
5. गरीब भुकेलेला- जर पितृपक्षामध्ये एखाद गरीब, गरजू आणि भुकेलेल्या व्यक्तीला भोजन दिले तरी आपल्या पितरांना शांती भेटते.
पितृपक्षाची पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार फार पूर्वीची गोष्ट आहे. महाभारतातील योध्दा कर्ण ज्याला दानवीर कर्ण असे देखील म्हणतात. याने आपले संपूर्ण जीवन दानधर्म, परोपकार आणि सत्कर्म करण्यात घालवले. कर्ण हा सूर्यपुत्र होता, आणि एक महान दानवीर म्हणून प्रसिद्ध होता.
कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा स्वर्गात प्रवेश झाला, पण तिथे त्याला जेवण म्हणून फक्त सोनेच मिळत होते – सोन्याचे अन्न, सोन्याचे फळ इत्यादी. त्याला खूप आश्चर्य वाटले आणि ते अन्न त्याला खाता येत नव्हते.
तेव्हा कर्णाने यमराजांना विचारले, “मी इतके दान धर्म केले, माझ्यासारख्या दानी व्यक्तीला हे सोन्याचे अन्न का खाण्यासाठी दिले जात आहे? मी नेहमीच गरीबांना मदत केली आहे.”
त्यावर यमराज म्हणाले
“हो, तू आयुष्यभर अन्न, धन, वस्त्रे सर्व काही दान केलेस, परंतु तू कधीच तुझ्या पूर्वजांना अन्नदान केले नाहीस, त्यांचे श्राध्द केले नाहीस. त्यामुळे तू स्वर्गात असूनसुद्धा अन्नास मुकला आहेस.”
कर्णाला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. त्याने यमराजांना प्रार्थना केली की त्याला काही काळ पृथ्वीवर परत जाऊन पितरांसाठी श्राध्द करण्याची परवानगी द्यावी. यमराजांनी त्याला १६ दिवसांची कालावधी दिला, ज्यामध्ये कर्णाने आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राध्द केले.
तेव्हापासून हे १६ दिवसाचे पितृपक्ष सुरु झाले असे म्हणतात.
हे देखील वाचा ;-
- गौरी गणपती माहिती 2025, गौरी कोण आहे? महत्त्व, कथा
- ऋषी पंचमी माहिती | ऋषी पंचमी कशी साजरी करावी?
- छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- आपण गणेश उत्सव का साजरा करतो? | गणपती का बसवतात?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- हरतालिकेचे महत्व काय?
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ( छावा ) – एक पराक्रमी निडर योद्धा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- बैलपोळा का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा आणि संपूर्ण माहिती
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती
- नागपंचमीची संपूर्ण माहिती, कथा, पूजा आणि का साजरी केली जाते?