कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणार हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. हा दिवस माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो. इंग्रजी कालगणनेनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तर मराठी कालगणनेनुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेस कोजागीरी साजरी केली जाते. या पौर्णिमेला ‘माणिकेथारी’ (मोती तयार करणारी) असे देखील म्हटले जाते. या पोर्णिमेबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय?
अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात. ही पौर्णिमा अतिशय प्रकाशमान असते, चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशमान होतो. पौराणिक माहितीनुसार व आयुर्वेदानुसार या दिवशी चुलीवर किंवा गॅस वरती दूध आटवण्यासाठी अंगणात किंवा गच्चीवरती ठेवतात. ते दूध तोपर्यंत आटवतात जोपर्यत चंद्राचे प्रतिबिंब त्यात दिसत नाही. जेव्ह चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते तेव्हा त्याचे तेजस्वी आणि प्रकाशमान किरणे त्या दुधात पडतात आणि आयुर्वेदानुसार हे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते.
कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते?
भारतीय संस्कृतीच्या मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री ‘को जागर्ति’ असे म्हणते. ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे’ त्याला पुढे कोजागिरी असे म्हणू लागले. ‘को जागर्ति’ असे म्हणत लक्ष्मी माता पृथ्वीतलावर संचार करते आणि जे जागरण करत असेल त्याच्यावरती कृपा करते. असे म्हणतात की कोण जगात आहे याचा अर्थ कोण ज्ञानासाठी सजक आहे आणि जागृत आहे असे देवी विचारते. त्यामुळे या दिवशी भजन, अभंग आणि गायन करून जागरण केले जाते.
कोजागिरी पौर्णिमा कथा
पौराणिक कथेनुसार श्री कृष्णाने वृंदावनामध्ये याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व गोपिकांसोबत रासलीला केली. श्री कृष्णाच्या मधुर बासरीच्या आवाजाने परिसरातील सर्व गायींना पान्हा फुटला आणि त्यांचे दूध वाहू लागले. तेथील गवळ्यांनी ते दूध मटक्यामध्ये धरले त्या दुधामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडला व ते दूध अमृतमय झाले. आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला. तेव्हापासून भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पोर्णिमेला जागरण करून दूध आटविण्यास सुरुवात झाली.
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व
- कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूच्या सुरुवातीचा हा दिवस मानला जातो.
- या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये आटवलेले दूध आरोग्यासाठी औषधी मानले जाते, ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते.
- भजन आणि जागरणामुळे देवीचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो.
- या दिवशी सर्व एकत्र येऊन एकमेकातील मतभेद विसरतात आणि हा उत्सव साजरा करतात.
पूजा व विधी
- रात्रीच्या वेळी म्हणजेच चंद्र मध्यावर येण्याच्या आधीपासून दूध आटवण्यासाठी ठेवायचे.
- हे दूध आटत असताना भजन – कीर्तन करावे, देवाची भक्तिगीते म्हणावी त्याची आराधना करावी.
- काही ठिकाणी या दिवशी व्रत करून देवीची कथा ऐकली जाते.
- रात्री १२ वाजल्यानंतर चंद्रप्रकाश जेव्हा दुधात पडतो म्हणजेच चंद्र अगदी डोक्यावर येतो तेव्हा दूध काढून देवाला नैवेद्य दिल्यानंतर आपण दूध घ्यावे.
हे देखील वाचा ;-
- Long ukhane in marathi for female | सुंदर मराठी मोठे उखाणे
- गौरी गणपती माहिती 2025, गौरी कोण आहे? महत्त्व, कथा
- ऋषी पंचमी माहिती | ऋषी पंचमी कशी साजरी करावी?
- छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- आपण गणेश उत्सव का साजरा करतो? | गणपती का बसवतात?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- हरतालिकेचे महत्व काय?
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ( छावा ) – एक पराक्रमी निडर योद्धा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- बैलपोळा का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा आणि संपूर्ण माहिती
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती
- नागपंचमीची संपूर्ण माहिती, कथा, पूजा आणि का साजरी केली जाते?