सर्वांचे आवडते दैवत गणपती बाप्पाचे आगमन म्हणजेच गणेश चतुर्थी २०२५ मध्ये कधी होणार याची लहान मुलापासून ते अगदी मोठ्या व्यक्तीपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहे. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता व बुद्धीचे दैवत मानले जातात. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही. श्री गणेश हे भगवान देवाधी देव महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र. भारतामध्ये गणेश उत्सव म्हणचे सर्वांच्याच घरामध्ये सर्व दुःख विसरून एक मोठा सोहळाच साजरा केला जातो. २०२५ मध्ये गणेश उत्सव कधी सुरु होत आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
२०२५ मध्ये गणपती स्थापना कधी करावी? पूर्ण माहिती जाणून घ्या!
तिथीनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाची प्रत्येक घरामध्ये स्थापना केली जाते. तर तारखेनुसार २०२५ मध्ये श्री गणेशाची स्थापना २७ ऑगस्टला होईल. १० दिवसाच्या या उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्दशीला केली जाते. म्हणजेच ६ सप्टेंबरला होईल.
पूजन मुहूर्त – सकाळी 11:15 वा पासून दुपारी 1:45 वा पर्यंत.
चंद्र दर्शन टाळा – या कालावधीमध्ये चतुर्थीचे चंद्र दर्शन टाळल्याने दोष टाळतात.
भगवान श्री गणेश यांचा जन्मदिवस कधी असतो आणि त्यामागील कथा
माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हणले जाते. हा गणपती बाप्पाचा जन्म दिवस होय.
पुराणानुसार, पार्वती मातेने त्यांच्या मळापासून मुल तयार केले आणि त्या बालकाला त्यांनी स्वशक्तीने सजीव केले अशाप्रकारे श्री गणेशाची निर्मिती केली. पार्वती माता जेव्हा अंघोळीला गेल्या तेव्हा त्यांनी श्री गणेशाला बाहेर पहारा ठेवायला सांगितले. याच दरम्यान भगवान शिव तिथे आले आणि गणेशाने त्यांना अडवले. रागाने भगवान शिवाने त्याचे शिर धडावेगळे केले. हा सर्व प्रकार समजताच पार्वती माता शोक करू लागल्या, पार्वतीच्या शोकामुळे, नंतर श्री गणेशाला हत्तीचे शिर लावून पुन्हा जीवंत करण्यात आले. आणि तेव्हापासून श्री गणेशाला सर्व देवांमध्ये प्रथम पुजण्याचा मन मिळाला.
आपण गणेश उत्सव का साजरा करतो? | गणपती का बसवतात?
गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा. सर्व समाजातील लोक एकत्र येऊन भगवान श्री गणेशाची स्थापना करतात. पण हा उत्सव फक्त धार्मिक नव्हे, तर त्यामागे एक सामाजिक आणि ऐतिहासिक करण देखील आहे. गणपती का बसवतात आणि त्यामागील करणे या सर्व गोष्टींबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
- धार्मिक कारण– भगवान गणेश हे विघ्नहर्ता व बुद्धीचे दैवत मानले जातात. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही. “श्रीगणेशा समारंभे कार्यारंभे शुभं भवेत्” गणेशाची मूर्ती घरात आणून पूजा केल्याने संकटे दूर होतात, मनःशांती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- ऐतिहासिक कारण– लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. त्यामागे मुख्य उद्देश होता – ब्रिटिशांच्या विरोधात लोकांमध्ये एकात्मता निर्माण करणे. धार्मिक उत्सवामुळे ब्रिटिश सरकार विरोध करू शकणार नाही आणि त्या निमित्ताने सर्व लोक एकत्र येऊ शकतील म्हणून या उत्सवाची सुरुवात झाली.
गणपती बाप्पा बददल माहिती
गणेश चतुर्थी हि दर महिन्यात येते (हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी), पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी विशेष असते कारण आपण या चतुर्थीला गणपती बसवतो. त्यालाच आपण गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी किंवा गणपती बसण्याचा दिवस म्हणून ओळखतो.
चतुर्थीचे व्रत केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात, वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हणतात तर जी चतुर्थी मंगळवारी अली तर तिला अंगारकी चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी असे म्हणतात.
हिंदू धर्मामध्ये कितीही संप्रदाय अथवा पंथ असो परंतु, प्रत्येक धर्मामध्ये श्री गणेशाची पूजा हि केलीच जाते. श्री गणेश हे भगवान विष्णू यांचा अवतार आहे. आणि ते भगवान शिवाचे पुत्र आहे त्यामुळे शैव आणि वैष्णव दोनही पंथ त्यानं पूजतात.
गणेश उत्सव हा प्रथेनुसार दीड दिवस, दोन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस असा साजरा करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या आनंदाने भव्य मिरवणूक काढून गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या“. या जयघोषात बाप्पाचे विसर्जन केले जाते.
गणपती बसवतांनी कोणती काळजी घ्यावी
- गणेशमूर्ती निवडताना नेहमी डाव्या सोंडेची आणि प्रसन्न चेहऱ्याची गणेश मूर्ती घ्यावी.
- गणेश मूर्ती अखंड असावी, मूर्ती कुठेही तुटलेली नसावी.
- पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची मूर्ती हि अतिशय शुभ मानली जाते.
- गणपतीच्या मूर्तीची स्थापना घराच्या पश्चिम, उत्तर-पूर्व (ईशान्य) किंवा उत्तर दिशेला करावी.
- स्थापनेची आणि पूजेची सर्व तयारी झाल्यावरच मुहुर्तावर श्री गणेशाची मूर्ती घरी आणावी.
सामाजिक संदेश
- प्रदूषण टाळण्यासाठी गणपतीची मूर्त शक्यतो चिकणमाती (शाडूची माती ) किंवा इतर इको-फ्रेंडली साहित्या पासून तयार केलेली केव्हाही चंगली.
- मिरवणुकीमध्ये गुलाल ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा जेणेकरून कुणाच्या डोळ्याला त्रास होणार नाही.
- गणपतीची मूर्त पाण्यात विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते म्हणून या मूर्ती छोट्याशा तलावामध्ये किंवा टाकीमध्ये बुडवून दान करावी. ज्यमुळे जलप्रदूषण टाळले जाईल.
- पूजेचे निर्माल्य नदीमध्ये टाकू नये.
हे सुद्धा वाचा;-
- छत्रपती शिवाजी महाराज – जन्म, मृत्यू, पत्नी आणि इतिहासाबद्दल काही माहिती
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- हरतालिकेचे महत्व काय?
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ( छावा ) – एक पराक्रमी निडर योद्धा
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे
- बैलपोळा का साजरा केला जातो? जाणून घ्या कथा आणि संपूर्ण माहिती
- पैठणी साडी चे प्रकार, कलर आणि इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती
- आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी बद्दल संपूर्ण माहिती




