Home Cultural India Events नागपंचमी माहिती | Nag Panchami Mahiti in Marathi
    EventsCultural India

    नागपंचमी माहिती | Nag Panchami Mahiti in Marathi

    nagpanchami

    नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नाग देवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. २०२५ मध्ये नागपंचमी दिनांक २९ जुलै, मंगळवार रोजी येत आहे.

    नागपंचमीचे धार्मिक महत्त्व | नागपंचमी का साजरी करतात?

    हिंदू धर्मामध्ये सर्प (नाग) हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत. भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग. तर भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात. यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे.
    श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपाशिर्वादास पात्र होता येते.

    या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते.

    ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात.

    नागपंचमीची पौराणिक कथा | nag panchami story

    1. श्रीकृष्ण आणि कालिया नागाची कथा

    गोकुळच्या जवळूनच वाहणारी यमुना नदी अतिशय स्वच्छ आणि पवित्र होती, पण त्यानंतर त्या नदीत कालिया नाग येऊन राहू लागला त्याच्या विषाने नदीचे पाणी खराब होऊ लागले. लहानपणी श्री कृष्ण गोकुळात नदीच्या कडेला खेळत असताना श्री कृष्ण पाण्यात उतरले आणि कालिया नागासोबत युद्ध सुरु झाले. या दोघांच्या युद्धामध्ये श्री कृष्ण जिकंले व त्यांनी कालिया नागाच्या फणा वरती नृत्य केले. त्यानंतर कालिया नाग श्री कृष्णाच्या सांगण्यावरून यमुना नदीमधून निघून गेला. यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला.

    2. शेतकऱ्याची कथा

    एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिणीच्या बिळावरून गेले आणि नागिणीचे पिल्लं मरण पावले. रागाने त्या नागिणीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिणीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला.

    नागपंचामी कशी साजरी करावी? | नागपंचमीची पूजा

    • नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो.
    • बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात.
    • घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते.
    • नागदेवतेला हळदी – कुंकू लावले जाते.
    • काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते, तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते.
    • नागदेवतेला धूप – दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो.
    • नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात.

    नागपंचमीचे महत्व

    • आपल्या कुटुंबाला जर सर्पदोष असेल तर तो नागाची पूजा केल्याने कमी होतो.
    • कुटुंबातील शांततेसाठी आणि समृद्धीसाठी नागाची पूजा केली जाते.
    • कुटुंबियांच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी नागदेवतेची पूजा करतात.
    • तसेच नागदेवतेची पूजा केल्याने महादेव देखील प्रसन्न होतात.

    नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नये

    • नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये.
    • चाकू, सूरी, कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये.
    • शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशीच जनावरांसाठी चारा कापून ठेवतो.
    • तसेच महिलांनी देखील किचनमधे चाकू, सुरीचा वापर करू नये. कुठलाही भाजीपाला कापू नये.
    • या दिवशी तव्याचा वापर करू नये. आदल्या दिवशीच ताव बाजूला ठेऊन दिला जातो. त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध – लाह्या खातात.
    • नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही.
    • सर्पांना दूध पाजणे टाळावे, हे परिवारणाच्या दृष्टीने हानिकारक आहे.

    हे सुद्धा वाचा;-

    Related Articles

    kojagiri purnima
    EventsCultural India

    कोजागिरी पौर्णिमा | शरद पौर्णिमा

    कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणार हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे....

    गौरी गणपती
    EventsCultural India

    गौरी गणपती | गौरीपूजन

    गौरी गणपती महाराष्ट्रामधील एक पारंपरिक सण आहे. गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घराघरांत गौरी...

    पितृ पक्ष
    Cultural IndiaEvents

    पितृ पक्ष माहिती | pitru paksh information in marathi | सर्वपित्री अमावस्या

    पितृपक्ष, भाद्रपद महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष येतो. याच पितृपक्षाला श्राद्धपक्ष, महालय...

    ऋषीपंचमी माहिती
    Cultural IndiaEvents

    ऋषी पंचमी माहिती मराठीत | भाद्रपद पंचमी व्रत

    ऋषी पंचमी हे भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वपूर्ण व्रत आहे. आपल्या पुराणांनमध्ये...