होळी २०२४ – हा फक्त रंगांचा सण नसुन तो धार्मिक, पारंपारिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला सण आहे. हा सण भारतासह जगभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यामागे काही प्राचीन आणि पौराणिक कथा आहेत.
हा सण भारतातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो.
2024 मध्ये होळी कधी आहे? | When is holi date in 2024?
फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा ही 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरू होत आहे आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता पौर्णिमा संपेल. त्यामुळे होलिका दहन 24 मार्च रोजी रविवारी आहे. आणि दुसऱ्या दिवशी 25 मार्च रोजी होळी / धूलिवंदन आहे.
2024 मध्ये होळी पेटवण्याचा मुहूर्त | Holi Time in 2024
२०२४ मध्ये होळी पेटवण्याचा मुहूर्त हा संध्याकाळी 0७:१९ ते ०९:३८ पर्यंत आहे. जो होळी दहनासाठी योग्य वेळ मानला जात आहे.
होळी कधी साजरी केली जाते? | When is Holi celebrated?
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो, होळी या सणाची सुरुवात फाल्गुनी पौर्णिमेपासून होते आणि पंचमी पर्यंत हा सण साजरा केला जातो.
होळी म्हणजे काय? | What is Holi?
होळी, ज्याला रंगांचा सण म्हणून ओळखले जाते, हा एक हिंदू सण आहे जो हिवाळा संपतो आणि वसंत ऋतूचे ( उन्हाळा ) सुरुवात होते तेव्हा म्हणजेच मार्चमध्ये येतो.
हा सण दोन दिवस साजरा केला जातो, पहिल्या दिवशी संध्याकाळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते. यामध्ये ऊस, लाकडे, एरंडाची फांदी, गायीच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या ज्याला समिधा म्हणतात. हे सर्व आपल्या घरासमोर किंवा चौकामध्ये सार्वजनिक ठिकाणी रचवून पेटवले जाते.
होळीला पुरणपोळीचा किंवा गोडाचा नैवेद्य दिला जातो आणि होळीला नारळ अर्पण करतात त्यानंतर तांब्यामध्ये पाणी घेऊन पेटवलेल्या होळीभोवती गरके मारले जातात. आणि बोंबा ( तोंडावर हात आपटून ओरडणे ) मारल्या जातात.
धुलीवंदन किंवा धुळवड म्हणजे काय? | Dhulivandan | Dhulvad?
होळीचा दुसरा दिवस हा धूलिवंदन किंवा धुळवड म्हणून ओळखला जातो. या दिवशी होळीला वंदन करून होळीची राख एकमेकांना लावली जाते आणि उडवली जाते म्हणून याला धुळवड असे म्हणतात.
होळी सणाची विविध प्रांतातील विविध नावे | Different names of Holi in different regions
- महाराष्ट्र- होळी
- गोवा- शिग्मो
- आसाम- फाकुवा
- बिहार- फागुवा
- केरळ- मंजाल कुली
- मणिपूर- याओसांग
- बंगाल- दोल जत्रा
- उत्तराखंड- खडी होली
- उत्तर प्रदेश- लाठमार होली
- पंजाब- होला मोहल्ला
- होळीची इतर काही पारंपारिक नावे होलिका दहन, होळी, शिमगा, शिमगो, कामदहन, फागुन दोलायात्रा, हुताशनी महोत्सव, फाग, फाल्गुन महिन्यात येत असल्यामुळे फाल्गुनोत्सव.
होळीची पौराणिक कथा | The mythological story | आपण होळी का साजरी करतो | Why do we celebrate?
भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप ची कथा | The story of Bhakta Prahlad and Hiranyakashyap
हिंदू पौराणिक कथांमध्ये होळीला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. होळी या सणाची सर्वात प्रसिद्ध पौराणिक कथा आहे ती भक्त प्रल्हादाची. भक्त प्रल्हाद हा भगवान श्री विष्णूचा मोठा भक्त होता त्यामुळे तो सतत भगवान श्री विष्णूंच्या भक्तीमध्ये तल्लीन राहत होता. आणि त्याचे वडील हिरण्यकश्यप हा एक राक्षस होता.
प्रल्हाद हा देवाची भक्ती करत असल्यामुळे हिरण्यकश्यपने त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो त्याच्या देवावरील भक्तीमुळे प्रत्येक वेळेस वाचला. हिरण्यकश्यपची बहीण होलिका जी एक राक्षस होती आणि तिला अग्नीचे वरदान होते कि ती कधीच अग्निमध्ये पेटणार नाही. हिरण्यकशिपूने तिला सांगितले कि तू प्रल्हादाला घेऊन अग्नी मध्ये बस ज्यामुळे तो मरण पावेन.
म्हणून ती भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नित बसली. परंतु, तिने तिच्या शक्तीचा उपयोग वाईट गोष्टीसाठी केल्यामुळे होलिका स्वतःच त्या अग्निमध्ये जाळून गेली आणि भक्त प्रल्हाद वाचाला. जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून तेव्हापासून होलिका दहन साजरे केले जाते.
भगवान शिव आणि कामदेवाची कथा | The story of Lord Shiva and Kamadeva
पार्वती मातेला भगवान शिव बरोबर लग्न करायचे होते. परंतु, भगवान शिव हे घोर तपश्चर्येमध्ये मग्न होते. त्या वेळेस देवांनी कामदेवाला भगवान शिवाची तपश्चर्या भंग करण्यास सांगितले. त्यानंतर कामदेवाने बान मारून जेव्हा भगवान शिवाचे तप भंग केले, तेव्हा भगवान शिव ने त्यांचा तिसरा डोळा उघडून कामदेवाल अग्निमध्ये भस्म केले. परंतु, पार्वती मातेला बघितल्यानंतर त्यांचा क्रोध शांत झाला.
त्यानंतर कामदेवाची पत्नी राती हिने देवतांकडे पतीला जिवंत करण्याची मागणी केली, तेव्हा भगवान शिव यांनी कामदेवाला पुनर्जीवित केले तेव्हा पुष्पांची आणि रंगांची उधळण केली गेली.
कृष्ण आणि राधाची कथा | The story of Krishna and Radha
पौराणिक कथेनुसार असे म्हणतात कि लहानपणी पुतना राक्षसीण श्री कृष्णाला मारण्यासाठी अली होती. तिने तिचे विषारी दूध श्रीकृष्णाला पाजून मारण्याचा प्रयत्न केला पन यामुळे तीच मरण पावली आणि हे विषारी दूध पिल्यामुळे श्रीकृष्णाचा रंग सावळा झाला.
राधा आणि इतर गोपिका गोऱ्या होत्या त्यामुळे श्रीकृष्णाला त्याच्या सावळ्या रंगामुळे वेगळे वाटू लागले. श्रीकृष्णाने आई यशोदेला हे सांगितल्यावर यशोदा श्रीकृष्णाला म्हणाली कि तू राधा आणि गोपिकांना जाऊन रंग लाव त्यामुळे त्या देखील तुझ्यासारख्या होतील. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना रंग लावला, आणि तेव्हापासून या प्रथेची सुरुवात झाली.
होळी सणावरील मराठी गाणे | Marathi song on Holi festival
- होळी रे होळी पुरणाची पोळी… (चित्रपट : लई झक्कास)
- आला होळीचा सण लई भारी… (चित्रपट : लय लय भारी)
- होळी पुनवचा होळी पुनवचा सण…
- खेळताना रंग बाई होळीचा होळीचा.. (उत्तरा केळकर लावणी)
हे सुद्धा वाचा :-