Home Cultural India Events स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज माहिती: एक निडर, शूरवीर आणि पराक्रमी योद्धा ( छावा )
    EventsCultural India

    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज माहिती: एक निडर, शूरवीर आणि पराक्रमी योद्धा ( छावा )

    chhatrapati sambhaji maharaj

    छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र व हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. ते केवळ पराक्रमीच नव्हे, तर अत्यंत बुद्धिमान, बहुभाषिक आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारे महान योद्धा होते. संभाजी महाराजांचे संपूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले होते. त्यांना छत्रपती शिवरायांचा छावा असे देखील म्हणत.

    छत्रपती संभाजी महाराजांची कौटुंबिक माहिती

    संभाजी महाराजांच्या आई सईबाई यांचे निधन महाराज लहान असतानाच झाले. राजमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला व धाराऊ या त्यांच्या दूध आई बनल्या. संभाजी महाराज्यांच्या सावत्र आई पुतळाबाई या महाराजांना खूप माया लावत. परंतु सावत्र आई सोयरा बाई मात्र महाराजांचा नेहमीच द्वेष करत. त्यांच्या राज कारभारामध्ये सतत ढवळाढवळ करत.

    महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्या अत्यंत देखण्या आणि हुशार होत्या, तसेच राजकारभार संभाळण्यामध्ये देखील अत्यंत कुशल होत्या. छत्रपती संभाजी महाराजांना एक मुलगा आणि एक मुलगी होती, मुलाचे नाव शाहू महाराज व मुलीचे नाव भवानीबाई होते.

    छत्रपती संभाजी महाराजांचे शिक्षण आणि शौर्य

    संभाजी महाराज अत्यंत हुशार, चतुर आणि राजनीतीमधील डावपेच अतिशय कुशलतेणे हाताळत, त्यांना अनेक भाषांचे ज्ञान अवगत होते. महाराज दिसायला अत्यंत देखणे आणि शूरवीर होते. राजनीतीचे बाळकडू त्यांना लहानपनपासूनच मिळाले. महाराज ९ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्र्याला मुघल दरबारात नेले होते. यामागील कारण म्हणजे मुघलांच्या दरबारातील कारभार कशापद्धतीने चालतो हे संभाजी महाराजांना लक्षात येईल.

    संभाजी महाराज हे संस्कृत, मराठी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये पारंगत होते. त्यांनी लहान वयातच युद्धकला आणि प्रशासनाचे शिक्षण घेतले. छत्रपती संभाजी महाराजांनी “बुधभूषण” नावाचा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 16 जानेवारी, 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

    महाराजांच्या जीवनातील संघर्ष

    राजकारभारातील अनेक मंडळींसोबत संभाजी महाराजांचे मतभेद असायचे. परंतु, शिवाजी महाराजांचे जुने जाणते मंडळ असल्या कारणाने शिवाजी महाराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. संभाजी महाराजांना ते आवडत नसत, त्यामुळे कारभारातील काही मानकरी संभाजी महाराजांना नेहमीच विरोध करत असायचे. शिवाजीमहाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यास अष्टप्रधान मंडळ नकार देत असे. तर काही त्यांना अपमानास्पद वागणूक देत.

    मुघलांविरुद्ध संघर्ष

    छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेब विरुद्ध ९ वर्षे सातत्याने संघर्ष केला. त्यांनी मुघलांविरुद्ध अनेक निर्णायक लढाया जिंकल्या. त्यांनी बुर्ली, रामसेज, जिंजी आणि पन्हाळगड यांसारख्या अनेक किल्ल्यांवर मुघलांना मोठ्या प्रमाणात पराभूत केले.

    छत्रपती संभाजी महाराजांना कोणी मारले?

    १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या काही जबाबदार सैनिकांसोबत कोकणातील संगमेश्वर येथे मुघलांच्या विरोधातील एका महत्वाच्या बैठकीसाठी गेले होते. परंतु महाराजांच्याच जवळच्या काही विश्वासू माणसांनी दगा केला आणि १ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबच्या सरदार मुकर्रबखान याने महाराजांना पकडले. मराठे आणि शत्रूच्या सैनिकांमध्ये चकमक झाली परंतु मराठे कमी होते व शत्रूसैन्य मोठे. महाराज आणि त्यांच्या सैन्याने खूप लढा दिला परंतु शत्रूबळ मोठे होते. अखेरीस शत्रूने संभाजी महाराज व कवि कलश या दोघांना जिवंत पकडले व औरंगजेब कडे नेले.

    औरंगजेबाने महाराजांना कैद करून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करण्याची सक्ती केली होती, परंतु त्यांनी ती धुडकावून लावली होती. संभाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने त्यांची निर्घृण हत्या केली. म्हणून संभाजी महाराजांना “धर्मवीर” असे म्हणतात. ज्यांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले. त्यांचे बलिदान स्वराज्यासाठी एक प्रेरणादायी अध्याय आहे.

    छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष जगले?

    छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू ११ मार्च १६८९ रोजी झाला. छत्रपती संभाजी महाराज फक्त ३२ वर्ष जगले परंतु त्यांची कारकीर्द आणि त्यांचे बलिदान भल्या भल्याना लाजवेल असे होते.

    छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा

    संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक आहे. त्यांच्या कार्यामुळे हिंदवी स्वराज्य अधिक बळकट झाले. आजही ते हिंदवी स्वराज्याचे खरे रक्षक आणि धर्मवीर म्हणून ओळखले जातात.

    हे सुद्धा वाचा;-

    Related Articles

    kojagiri purnima
    EventsCultural India

    कोजागिरी पौर्णिमा | शरद पौर्णिमा

    कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणार हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे....

    गौरी गणपती
    EventsCultural India

    गौरी गणपती | गौरीपूजन

    गौरी गणपती महाराष्ट्रामधील एक पारंपरिक सण आहे. गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घराघरांत गौरी...

    पितृ पक्ष
    Cultural IndiaEvents

    पितृ पक्ष माहिती | pitru paksh information in marathi | सर्वपित्री अमावस्या

    पितृपक्ष, भाद्रपद महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष येतो. याच पितृपक्षाला श्राद्धपक्ष, महालय...

    ऋषीपंचमी माहिती
    Cultural IndiaEvents

    ऋषी पंचमी माहिती मराठीत | भाद्रपद पंचमी व्रत

    ऋषी पंचमी हे भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वपूर्ण व्रत आहे. आपल्या पुराणांनमध्ये...