Home Lifestyle ५०+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये | Motivational thoughts in marathi
    LifestyleStatus

    ५०+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये | Motivational thoughts in marathi

    Motivational thoughts in marathi
    Motivational thoughts in marathi

    Motivational thoughts माणसामध्ये ठिणगी पेटवतात आणि आपल्याला आपल्या सर्वोच्च ध्येयाकडे नेण्यासाठी प्रेरित करतात. जेव्हा माणुस पुर्ण नैराश्यमय होतो त्यावेळेस प्रेरणादायी विचार माणसाला अंधाराकडुन आशेच्या किरणाकडे घेऊन जातात. आपल्यामधील अंतर्गत असलेली जन्मजात शक्तीची आणि लवचिकतेची आठवण करुन देतात. प्रतिकूल परिस्थितीत, ते आपल्या अंतःकरणात धैर्याची ठिणगी पेटवतात. आपल्याला धीर धरण्यास आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. प्रत्येक प्रेरित विचाराने, आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार बनतो.

    दिवसांमधील कमीत कमी १५ मिनटे माणसाने प्रेरणादायी विचाराचे वाचन केले पाहिजे, त्यामुळे पुढील जीवन जगण्यासाठी माणसाला बळ मिळते. काही Motivational speaker ला आपण फॉलो करू शकतो जसे की sandeep maheshwari आणि Dr. Vivek Bindra. यामध्ये काही प्रसिद्द पुस्तकांचे पण वाचन करता येईल.

    • जीवनात पुढे जायचं असेल, तर बहिरे व्हा. कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं
    • यशस्वी होणारी लोक आपल्यासारखीच सर्वसाधारण असतात फक्त कठोर परिश्रम कसे करावे हे त्यांना माहीत असते.
    • स्वप्न पाहण्याबद्दल हरकत नाही पण स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी किती लोक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात हे खूप महत्त्वाच.
    • जगातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात. पण तेच काम आपण करून दाखवणे.
    • नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा.. कारण सोनाराचा कचरा हा बदामा पेक्षाही महाग असतो.
    • जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता, तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे.
    • भीती भावना नसून लोकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
    • चांगल्यातून चांगलेच निर्माण होते आणि वाईटातुन नेहमी वाईटच निर्माण होते.
    • रस्ता भरकटला असाल, विसरला असाल, तर योग्य रस्ता निवडण्याची हीच योग्य वेळ आहे.

    जगातील सर्वात सुंदर प्रेरणादायी कोट्स

    • तुमच्या कामावर प्रेम करा आणि जे तुम्हाला पाहिजे आहे पण मिळाले नाही ते मिळेपर्यत थांबु नका. – स्टीव्ह जॉब्स
    • आजची शंका ही उद्याच्या जाणीवेची एकमात्र कारण असेल. – आजची शंका ही उद्याच्या जाणीवेची एकमात्र कारण असेल. – फ्रँकलिन डी. रुझवेल्ट
    • दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यासाठी वयाची मर्यादा कधीच नसते. – सी एस लुईस
    • यशाचे मोजमाप तुम्ही जे काही साध्य करता त्यावरून होत नाही, तर तुम्हाला आलेल्या आव्हानांना ज्या धैर्याने तोंड दिले त्यावरुन ठरले जाते. – ओरिसन स्वेट मार्डन

    हे विचार आपल्याला स्वत:शी प्रामाणिक राहण्याची, आव्हानांना सामोरे जाण्याची आणि यशासाठी धडपड करण्याची आठवण करून देतात.

    Motivational thoughts for students | विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार

    विद्यार्थाना प्रेरणादायी सुविचार गरजेचे असतात, त्यामुळे ते ध्येयापासून दूर जात नाही, आणि हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी विचार त्यांना झोपु देत नाही.

    This is Motivational thoughts for students who are completely exhausted in life.
    This is Motivational thoughts for students who are completely exhausted in life.
    • एक दिवस तुम्ही तक्रार वेळे विषयी नाही. तर स्वतः विषयी कराल की, एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होते, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात.
    • एक असे लक्ष निर्माण करा, की जे तुम्हाला सकाळी अंथरून सोडण्यास भाग पाडेल.
    • स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे विश्व तुम्हालाच साकारायचे आहे.
    • बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारांवर अवलंबून असतं.
    • स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण लोक वाट दाखवायला नाही, तर वाट लावायला बसलेली आहेत.

    Related Articles

    holi gift ideas
    LifestyleStatus

    होळी आणि रंगपंचमी… साठी काही ‘सुंदर’ भेट वस्तू चे पर्याय नक्की पहा!

    होळी महोत्सव, रंगांचा सण, भारत आणि जगाच्या इतर भागांमध्ये साजरा केला जाणारा...

    75 republic day wishes in marathi 2024
    StatusLifestyle

    75 Republic Day Wishes in Marathi : २०२४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    2024 साठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचा आमचा संग्रह पहा. आमच्या प्रेरणादायी संदेश...