दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो म्हणजेच वाईटावर सत्याचा विजय. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात केली जाते आणि अतिशय शुभ मानले जाते.
दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात?
नवरात्री सुरु होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घाटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते. याला देवी घटी बसने असे म्हणतात. या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरवात होते आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो. आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळविलेले विजय म्हणजेच विजयादशमी. तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजेच विजयादशमी.
दसऱ्याच्या दिवशी पूजा घरी कशी करावी?
देवी श्री महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते. म्हणजेच धनाची, ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते. धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची, ज्ञानाची पूजा म्हणजे वही, पाटी, पुस्तके, यंत्रे इत्यादी.. आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्रांचे पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते.
दिवा, धूप, अगरबत्ती लावून त्याची पूजा करावी आणि नौरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घाटातील उगवलेले धान्याचे रोप त्याला वाहावे. काही ठिकाणी महिला हे रोप ज्याला “धन” असे म्हणतात दसऱ्याला केसांमध्ये माळतात. तसेच आपट्याच्या पानांची पूजा केली जाते. या सर्व पूजेला हळदी कुंकू लावावे.
दसरा कसा साजरा केला जातो?
घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे फार महत्व असते. गाडीला, घराला, दुकानांना झेंडूच्या माळा लावल्या जातात. घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात, देवीचे दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात. आणि दशमीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवाला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडतात. या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याची पाने वाटत. तसेच दसऱ्याला शेतकऱ्याचे नवीन पीक घरामध्ये येते त्याची देखील पूजा केली जाते.
या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची, प्रभू श्री रामाची मिरवणूक देखील काढली जाते. श्री रामलीलाचे आयोजन केले जाते. या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते. गावातील पुरुष मंडळी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा असते यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात.
विजया दशमीला आपट्याची पाने का वाटतात?
या बद्दल एक अतिशय सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान श्री रामाचें वंशज “रघु” यांनी एकदा यांनी विश्वजीत यज्ञ केला व आपल्या जवळील सर्व धन त्यांनी दान केले. एक दिवस राजा रघु यांच्या दारात वरतंतू यांचा शिष्य “कौस्त्य” आला. त्याने राजाकडे भिक्षा मागितली तो पैठणच्या देवदत्त नावाच्या एका विद्वान ब्राह्मणाचा मुलगा होता. आणि विद्या शिकण्यासाठी बडोच नगरीत राहणाऱ्या “वरतंतू” कडे राहिला. सर्व विद्या आत्मसात केल्यावर त्याने आपल्या गुरूला आपण काहीतरी गुरुदक्षिणा मागावी अशी विनंती केली. तेव्हा त्याचे गुरु म्हणाले मी तुला कुठल्याही प्रलोभनाने विद्या शिकविली नाही. असे वरतंतूने त्याला स्पष्टपाने सांगितले परंतु तरीही कौस्त्याने त्यांच्याकडे काहीतरी मागण्याचा आग्रह केला. मग त्यांनी त्याच्याकडे “14 कोटी सुवर्ण मुद्रा” गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या. आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौस्त्या राजा रघु कडे सुवर्ण मुद्रा मागण्यासाठी आला. परंतु विश्वजित यज्ञामध्ये राजा रघु यांनी सर्व धन दान केल्यामुळे त्यांचा खजिना रिकामा झालेला होता. पण दरामध्ये आलेल्या अतिथी रिकामा जाऊ नाय म्हणून त्यांनी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरविले. हि बातमी इंद्रदेवाला समजताच त्यांनी राजा रघु यांच्या अयोध्या नागरीमधील ईशान्य दिशेला असलेल्या एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. कौस्त्याने फक्त आपल्या गुरूला देण्याइतक्याच १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या गुरूला गुरुदक्षिणा दिली. तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी. म्हणून विजयादशमीला आपट्याची पाने सुवर्ण म्हणजेच सोने म्हणून वाटण्याची प्रथा आहे.
दसऱ्याची पौराणिक कथा
दसऱ्याशी संबंधित प्रमुख दोन पौराणिक कथा आहेत.
1 – आदिशक्ती दुर्गा देवीने उन्मत्त राक्षस म्हैशासुराचा वध केला आणि अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला. सर्व देवतांचे रक्षण केले, देवीचा विजय झाला तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी म्हणून तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
2 – प्रभू श्री रामचंद्र यांनी रावनाच वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला व माता सीतेला सुखरूप परत आणले तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता. म्हणून या दिवसाला विजयादशमी (दसरा )असे म्हणतात. या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्याचे दहन केले जाते.
हे देखील वाचा:-
- नवरात्री : नवरात्री कथा, आदिशक्तीची निर्मिती का आणि कशी झाली? दुर्गा देवीची संपूर्ण रूपे, नावे आणि त्यांचे महत्व.
- दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
- श्री हनुमान जयंती / अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
- गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती व कथा
- श्रीकृष्णजन्माष्टमीची कथा, माहिती, इतिहास
- श्री रामांना मर्यादापुरुषोत्तम असे म्हणतात? आणि रामायणातील काही गुड रहस्यांबद्दल माहिती.
- भारतीय सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती आणि प्रकार
- पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे