Home Cultural India दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत
    Cultural IndiaEvents

    दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या साजरी करण्याची योग्य पद्धत

    दीप अमावस्या
    दीप अमावस्या

    दीप अमावस्या, जीला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते, हा सण हिंदू संस्कृतीतील महत्वाचा दिवस आणि विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जातो. ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये (जून-जुलै) येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावसेच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवसाचे महत्व आपण या ठिकाणी सविस्तरपने जाणून घेऊया. 

    दीप अमावस्या किंवा आषाढी अमावसेचे महत्व 

    दीप पूजन – दीप म्हणजेच दिवा, दीप अमावसेच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. 

    श्रावण – श्रावण महिना सुरु होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते 

    पितृ तर्पण – दीप अमावस्या हा पितृ तर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते. ज्यामुळे घरात जर पितृ दोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो. 

    देवी लक्ष्मी आणि दुर्गा –  काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख, समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात. 

    दीप अमावस्या कथा

    पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे, नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला. उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली, घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलवून दिले.
    पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एक झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले. त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावसेचा. राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली. राणी निर्दोष अढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले. राणीने केलेल्या दीप पूजेमुळे तिच्यावरील आळ टळला. राणीला दिवा पावला. अशी ही दीप अमावसेची कहाणी.

    दीप अमावसेच्या दिवशी काय करावे?

    संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात, फुलांचे तोरण लावतात, घरासमोर रांगोळी काढतात. मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात. काही ठिकाणी संपूर्ण घरांभोवती दिवे लावतात. 

    या दिवशी देवतांची पूजा ,आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्व आहे. 

    आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत. त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे. परंतु, या दीप अमावसेच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी.

    काही लोक दीप अमावसेला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात. कारण दीप अमावसेच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो. आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी नॉन व्हेज खात नाही. त्यामुळे ही लोकं दीप अमावसेच्या दिवशी नॉन व्हेज खातात, मद्यपान करतात आणि काही लोक अति मद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावासेला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे. परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे.

    हे देखील वाचा ;-

    Related Articles

    dussehra
    Cultural IndiaEvents

    दसरा का साजरा केला जातो? पूजा विधी, कथा व संपूर्ण माहिती

    दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा...

    navratri
    EventsCultural India

    नवरात्रीच्या ९ दिवसांचे महत्त्व काय? आणि का साजरी केली जाते?

    आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत ९ दिवस...

    हरतालिका व्रत कथा
    Cultural IndiaEvents

    हरतालिकेचे महत्व काय?

    हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येते. हरतालिका हा सण...

    बैलपोळा
    Cultural IndiaEvents

    बैलपोळा का साजरा केला जातो? | पिठोरी अमावस्या

    बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा सण आहे. शेतकऱ्याच्या कष्टामधील खरा...