Home Cultural India बैलपोळा का साजरा केला जातो? | पिठोरी अमावस्या
    Cultural IndiaEvents

    बैलपोळा का साजरा केला जातो? | पिठोरी अमावस्या

    बैलपोळा

    बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा सण आहे. शेतकऱ्याच्या कष्टामधील खरा साथीदार म्हणजे त्याचे बैलं. बैल हा मुक प्राणी असूनही त्याला त्याच्या मालकाबद्दल खूप प्रेम असते आणि त्याच्या मालकाचेही म्हणजे शेतकऱ्याचे देखील त्याच्यावर खूप प्रेम असते. बैल आणि शेतकऱ्यांमधील अनेक सुंदर जिव्हाळ्याचे उदाहरनं आपल्याला बघायला भेटतात. 

    पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण अमावसेला साजरा केला जातो या श्रावणी अमावसेला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात. या पोळ्याच्या दिवशी श्रावण समाप्त होतो. वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरे करतात. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा या प्रदेशात बघायला भेटतो. ज्यांच्याकडे शेती नाही आणि बैल नाही ते या दिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात. 

    पोळा कसा साजरा करता?


    बैलपोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या दिवशी बैलांकडून कुठल्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही, कारण हा बैलांच्या पूजेचा दिवस असतो. आजही भारतात हा सण शेतकरी पारंपारिक पद्धतीनेच साजरा करतात. सर्वप्रथम बैलांना नदीवर किंवा ओढ्यावरती नेऊन त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांना चारा पाणी दिले जाते. दिवसभर बैलांची सुंदर विविध रांगांमध्ये सजावट केली जाते. बैलांचे शिंगे रंगवली जातात त्यावर गेरूचे ठिपके दिले जातात. पाठीवरती झूल टाकली जाते. डोक्यावरती बाशिंग लावले जाते. नवीन वेसण, कासरा ( दोर  ) लावला जातो. गळ्यात कवड्यांची माळ आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात त्यालाच घोगरमाळ देखील म्हणतात. पायात रंगीत तोडे घातले जातात. आपला बैल सगळ्यात सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाला सजवण्याचा प्रयत्न करतो. 

    सर्व सजावट झाल्यानंतर गावातील सर्व शेतकरी बैलांची मिरवणूक काढतात. बैलांना मारुतीच्या देवळात नेले जाते मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते. सर्व बैल गावाच्या वेशीजवळ जमतात. तिथे सर्व बैलांना एकत्र उभे केले जाते आणि गावातील मुख्य व्यक्तीने इशारा करताच सर्व बैल अप – आपल्या घरी पळत सुटतात. त्यालाच ग्रामीण भागात पोळा फुटला असे म्हणतात. मग शेतकरी त्याच्या बैलांना घेऊन घरी निघतो. या दिवशी  बैलाला नैवेद्य देण्यासाठी प्रत्येक घरामध्ये गृहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. जेव्हा बैल त्यांच्या दारात जातो तेव्हा त्याची गंध लावून पूजा केली जाते. त्यांच्या वरून दिवा ओवाळला जातो आणि त्यांना गोड नैवेद्य पोटभरून खाण्यासाठी दिला जातो. अशाप्रकारे सुंदर पद्धतीने गावाकडे बैलपोळा आजही साजरा केला जातो. 

    बैलपोळ्याची कथा

    एकदा शंकर- पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत होते. खेळामध्ये भगवान शंकर हरले. परंतु, डाव मीच जिंकला असा दोघांमध्ये वाद सुरू झाला. याला साक्षीदार नांदी होता. पार्वतीने नंदीला कोण जिंकले असे विचारल्यावर “डाव शंकराने जिंकला” असे त्याने सांगितले. तेव्हा पार्वतीने नंदीला शाप दिला की “मृत्यू लोकात तुझ्या मानेवर जू ठेवून काम करून घेतले जाईल” नंदी पार्वती मातेला शरण आला. तेव्हा पार्वती मातेने “जो शेतकरी वर्षभर तुझ्या मानेवर जू ठेवील तो शेतकरी वर्षातून एकदा तुझ्याकडून काम करून न घेता तुला गोडधोड पदार्थ खाऊ घालून तुझी पूजा करील” असा नंदीला उ:शाप दिला. तेव्हापासून शेतकरी वर्षातून एकदा बैलपोळा साजरा करू लागला.

    हे देखील वाचा ;-

    Related Articles

    dussehra
    Cultural IndiaEvents

    दसरा का साजरा केला जातो? पूजा विधी, कथा व संपूर्ण माहिती

    दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा...

    navratri
    EventsCultural India

    नवरात्रीच्या ९ दिवसांचे महत्त्व काय? आणि का साजरी केली जाते?

    आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत ९ दिवस...

    हरतालिका व्रत कथा
    Cultural IndiaEvents

    हरतालिकेचे महत्व काय?

    हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येते. हरतालिका हा सण...

    shrikrishna janmashtami
    Cultural IndiaEvents

    श्रीकृष्णजन्माष्टमी | Shri Krishna Janmashtami

    श्रीकृष्णजन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोस्तव. भगवान श्री विष्णू यांचा आठवा अवतार म्हणजे...