Home Cultural India श्री कृष्ण जन्माष्टमी माहिती | Shri Krishna Janmashtami information in marathi
    Cultural IndiaEvents

    श्री कृष्ण जन्माष्टमी माहिती | Shri Krishna Janmashtami information in marathi

    श्री कृष्ण जन्माष्टमी

    श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव. भगवान श्री विष्णू यांचा आठवा अवतार म्हणजे श्री कृष्ण, श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म दिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारत देशामध्ये तसेच भारताबाहेर देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहामध्ये साजरी केली जाते. 

    हिंदू कालगणनेनुसार श्रावण महिन्यात तर इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी भाविक भक्त रात्री जागरण करतात, भजन करतात, गवळणी म्हणून जन्मोत्सव साजरा करतात. बाळ कृष्णाला सजवून त्याला सुंदर अलंकार करून पाळण्यामध्ये ठेवले जाते आणि अंगाई गीत किंवा सुंदर भजने म्हंटली जातात. 

    श्री कृष्ण जन्माष्टमी कथा 

    भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना कृष्णाचा मामा कंस याने कारागृहात डांबून ठेवले होते. वासुदेव आणि देवकी यांना सात अपत्य झाली त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि आठवे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्ग दाखविण्यासाठी या भूतलावर झाला. 

    श्रीकृष्णाची आई देवकी ही कंस याची बहीण होती. देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा वारातीमध्ये एक आकाशवाणी झाली “कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा आठवा पुत्र करेन”. हे ऐकताच कंसाला क्रोध आला आणि त्याने वासुदेव आणि बहीण देवकी या दोघांनाही बंदिगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले. त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्मताच मोठे होऊन ते म्हणाले “मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला”. भगवान श्रीकृष्णाने मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले.

    त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये ठेऊन गोकुळाकडे निघाला, श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता, परंतु, वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले, भगवान श्रीकृष्णाचे पाय यमुनेच्या पाण्याला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून एक भाला मोठा नाग त्यांच्यावर फना करून उभा राहिला. वासुदेव सुखरूप बाळकृष्णाला नंदाकडे सोडून आला.

    तेव्हाच नंदाला देखील मुलगी झाली होती ती मुलगी घेऊन वासुदेव कारागृहात परत आला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली. हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला तर ती मुलगी त्याच्या हातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये रूपांतर झाले. ती देवी म्हणाली “हे दुष्टा तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध कारेन” हे बोलून ती देवी गुप्त झाली.

    दहीहंडी 

    जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो त्या दिवसाला गोपाळकाला असे म्हणतात. या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये दहीहंडी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दहीहंडी फोडण्यासाठी मुलांचे एकावर एक असे थर उभे असतात. 

    दहीहंडी फोडण्यामागील कारण असे की भगवान श्री कृष्णला लोणी फार आवडत. पूर्वीच्या काळी महिला दुधापासून लोणी काढत आणि ते लोणी त्या महिला उंच जागेवरती ठेवत. श्री कृष्ण लहान असल्यामुळे त्यांचा हात पुरात नसे मग ते सर्व मित्र मिळून लोण्याचा माठ फोडून त्यातले लोणी चोरून खात असे, म्हणून भगवान श्रीकृष्णांना माखनचोर असे नाव पडलेले आहे. 

    गोपाळकाला

    एका गवळ्याने भगवान श्री कृष्णाचे पालन – पोषण केले. श्रीकृष्ण नेहमी गायी चारण्यासाठी मित्रांसोबत जंगलात जात असे तेथे सर्व मित्रांनी आणलेले जेवण ते एकत्र करायचे, त्याचा कला करायचे आणि सर्वांना खायला द्यायचे, म्हणून जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि तो महाप्रसाद सर्वांना वाटला जातो. 

    प्रभू श्री कृष्ण यांचा वध कोणी केला?

    यादव वंशाचा अंत झाल्यानंतर भगवान श्री कृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली खिन्न बसलेले होते. तेव्हड्यात दुरून एका शिकाऱ्याने त्यांना हरीण समजून त्यांच्या पायाला बाण मारला. जवळ जाऊन बघितल्यावर पश्चातापाने त्याने श्री कृष्णाची क्षमा मागितली आणि प्रभुनी त्याला माफ केले व त्याचा उद्धार केला.
    हा शिकारी पूर्वजन्मातला वाली होता. ज्याला प्रभू श्री कृष्णांनी राम अवतारामध्ये झाडाआड लपून बाण मारला आणि त्याचा वध केला होता.

    हे देखील वाचा ;-

    Related Articles

    kojagiri purnima
    EventsCultural India

    कोजागिरी पौर्णिमा | शरद पौर्णिमा

    कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणार हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे....

    गौरी गणपती
    EventsCultural India

    गौरी गणपती | गौरीपूजन

    गौरी गणपती महाराष्ट्रामधील एक पारंपरिक सण आहे. गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घराघरांत गौरी...

    पितृ पक्ष
    Cultural IndiaEvents

    पितृ पक्ष माहिती | pitru paksh information in marathi | सर्वपित्री अमावस्या

    पितृपक्ष, भाद्रपद महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष येतो. याच पितृपक्षाला श्राद्धपक्ष, महालय...

    ऋषीपंचमी माहिती
    Cultural IndiaEvents

    ऋषी पंचमी माहिती मराठीत | भाद्रपद पंचमी व्रत

    ऋषी पंचमी हे भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वपूर्ण व्रत आहे. आपल्या पुराणांनमध्ये...