Home Cultural India रक्षाबंधन बद्दल माहिती
    Cultural IndiaEvents

    रक्षाबंधन बद्दल माहिती

    रक्षाबंधन
    रक्षाबंधन

    रक्षाबंधन, ज्याला राखी म्हणून देखील ओळखले जाते, रक्षाबंधन हा सण श्रावणातील पौर्णिमेला येतो. यालाच नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. हा सण भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा हिंदू संस्कृतीतील पारंपारिक सण आहे. “रक्षा बंधन” या नावाचा अर्थ “संरक्षणाचे बंधन” असा होतो. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाच्या बंधनाचा हा सण आहे.

    रक्षाबंधनाचा मंत्र

    येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबल:।
    तेन त्वा अनुबंध्नामि रक्षे मा चल मा चल:।।

    रक्षाबंधनाच्या पूजेची पद्धत

    रक्षाबंधनाच्या दिवशी घरामध्ये स्वच्छ जागेवर पाट मांडावा, त्यापुढे सुंदर रांगोळी काढावी. भावाला त्या पाटावरती बसवावे. पूजेचे ताट तयार करून बहिणीने भावाच्या कपाळावर टिळा (लाल कुंकू ) लावावे अक्षदा लावाव्या त्यानंतर भावावरून दिवा ओवाळावा आणि त्याच्या हाताला मंत्र उच्चार करून राखी बांधावी. भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक संकटामध्ये तिचे संवरक्षण करण्याचे वचन देतो. त्यानंतर बहिणीला काहीतरी छोटेशी भेटवस्तू देतो.

    रक्षाबंधन का साजरी केली जाते? रक्षाबंधनचे महत्व

    रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या हाताला (मनगटाभोवती) राखी ( पवित्र धागा) बांधतात. हा धागा बहीण आपल्या भावाचे कुठल्याही संकटामध्ये संवरक्षण व्हावे म्हणून त्याच्या हाताला बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या आयुष्यातील कुठल्याही संकटामध्ये तिचे संवरक्षण करण्याचे वाचन देतो. विवाहित महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जातात. या प्रथेमुळे भाऊ आणि बहिणीतील प्रेमाचे नातं घट्ट होते. निस्वार्थ प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे भावा-बहिणीचं सुंदर नातं होय. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन ला फार महत्व आहे.

    रक्षाबंधनची सुरुवात कशी झाली? | रक्षाबंधनची कथा ( इतिहास )

    रक्षाबंधन बद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.

    1- पूर्वी देव आणि दानवांमध्ये खूप युद्ध झाले त्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांची शक्ती कमी पडू लागली. वृत्रासुर या दानवांच्या राजाने इंद्रदेवाला युद्धासाठी आव्हान दिले. इंद्रदेवाची पत्नी शची हिला भगवान विष्णू यांनी एक धागा ( राखी )दिला होता. तिची अशी श्रद्धा होती की त्या धाग्यामुळे इंद्रदेवाचे सांवरक्षण होईल. इंद्रदेवाच्या पत्नीने तो दोरा पतीच्या सांवरक्षणासाठी इंद्रदेवाच्या हाताला बांधला. ज्यामुळे इंद्रदेवाचे सांवरक्षण झाले आणि देवतांचा त्या युद्धामध्ये विजय झाला. आणि युद्धामध्ये गमावलेले सर्व वैभव देवतांना परत मिळाले. तेव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली असे म्हटले जाते.

    2- भारताचे महाकाव्य महाभारत यातील कथेनुसार, भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. भगवान श्री कृष्णाच्या मनगटातून वाहणारे रक्त थांबविण्यासाठी पांडवांची पत्नी द्रौपदी हीने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यांच्यामध्ये भाऊ आणि बहीणचे प्रेमाचं नातं निर्माण झाले. भगवान श्री कृष्णाने द्रौपदीला वचन दिले “मी तुझे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करीन”.

    3- आणखी एक अशी आख्यायिका आहे की मेवाडची राणी कर्णावती ही मुघलांचा सम्राट हुमायू याला भाऊ मानून राखी पाठवते. आणि तिचे राज्य संकटात असताना ती हुमायूकडे मदत मागते. राणी त्या संकटामध्ये हुमायू तिला मदत करतो.

    हे देखील वाचा –

    Related Articles

    dussehra
    Cultural IndiaEvents

    दसरा का साजरा केला जातो? पूजा विधी, कथा व संपूर्ण माहिती

    दसरा, भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो. हा...

    navratri
    EventsCultural India

    नवरात्रीच्या ९ दिवसांचे महत्त्व काय? आणि का साजरी केली जाते?

    आदीशक्ती जगन्माता आई भगवतीने या विश्वाच्या कल्याणासाठी उन्मत्त झालेल्या असुरांसोबत ९ दिवस...

    हरतालिका व्रत कथा
    Cultural IndiaEvents

    हरतालिकेचे महत्व काय?

    हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येते. हरतालिका हा सण...

    बैलपोळा
    Cultural IndiaEvents

    बैलपोळा का साजरा केला जातो? | पिठोरी अमावस्या

    बैलपोळा हा भारतीय संस्कृतीमधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्वाचा सण आहे. शेतकऱ्याच्या कष्टामधील खरा...