Home Cultural India दत्तजयंती माहिती
    Cultural IndiaEvents

    दत्तजयंती माहिती

    dattajayanti mahiti

    दत्तजयंती हा भगवान श्री दत्तात्रेय यांचा जन्मोत्सव. श्री गुरु दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. दत्तात्रेयांना त्रिदेव अवतार मानले जाते—ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार. त्यांचे स्वरूप वैराग्य, ज्ञान, योगसाधना आणि करुणा यांचे प्रतीक आहे.

    भगवान श्री गुरु दत्तात्रेय यांची जन्म कथा

    पारंपरिक कथेनुसार आणि पाचवा वेद मानलेल्या “श्री गुरुचरित्र” ग्रंथानुसार ऋषी अत्री आणि माता अनसूया हे दोघेही अत्यंत तपस्वी होते. माता अनुसया एक अत्यंत तेजस्वी पतिव्रता स्री होती, त्यांच्या पातिव्रत्याबद्दल त्रिलोकात चर्चा होती एक दिवस माता लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांनी नारद मुनींना विचारले सगळ्यात पतिव्रता स्त्री कोण आहे. त्यावर नारद मुनी म्हणाले माता अनुसया. हे ऐकताच त्यांनी अनुसया मातेची परीक्षा घ्यायची ठरवली. त्या तीनही देवींनी आपापल्या पतींना सांगून अनुसया मातेच्या तपस्वी सामर्थ्याची परीक्षा घेण्यास सांगितली.

    एक दिवस अत्री ऋषी अनुष्ठानासाठी नदीतीरी गेले असता माध्याह्नकाळी हे त्रिदेव साधू वेशात आश्रमात आले आणि मातेला म्हणाले भिक्षाम देही, मातेने भिक्षा देताच ते म्हणाले आम्हाला विवस्त्र भिक्षा पाहिजे. पती घरी नाही आणि अतिथी विनभोजन जाणे म्हणजे मोठे संकट. म्हणून माता अनुसया यांनी मनामध्ये पतीचे स्मरण केले आणि अतिथी हे आपली बालकेच आहे हा विचार मनात केला आणि त्यांना विवस्त्र होऊन भोजन देण्यास गेल्या त्यांच्या पवित्र्याने तीनही ऋषी छोटी बाळे झाली. हे बगताच मातेने पटकन वस्त्रे नेसली आणि त्या रडणाऱ्या बाळांना मांडीवर घेतले. माता अनुसया यांना पान्हा फुटला व त्यांनी तीनही बालकांना स्तनपान केले.

    अत्री ऋषी आश्रमात आल्यावर त्यांनी ती बालके बगितले आणि झाला प्रकार मातेने त्यांना सविस्तर सांगितला त्यावर अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने बघितले असता हे तीनही बालके त्रिदेव आहेत आणि ते अनुसयेची परीक्षा घेण्यास आले होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मातेने त्याना पाळण्यात घातले आणि अंगाई गीत म्हटले.

    आपले पती अजून का आले नाही? तीनही देवींनी नारद मुनींना विचारले असता अत्री ऋषींच्या आश्रमात घडलेला सर्व प्रकार नारद मुनींनी देवींना सांगितला. त्या देवी आपल्या पतींना आणण्यासाठी अनुसया मातेकडे गेल्या, त्यावर अनुसया माता म्हणाल्या “आपण आपले पती ओळखून घेऊन जा” त्या वेळेला तीनही देवींना त्यांची चूक लक्षात अली. त्यांनी मातेची क्षमा मागितली व त्याना शरण आल्या. अनुसया मातेने त्या तीनही बालकांना त्यांच्या मूळ रूपात आणले.

    प्रकट झालेले ब्रह्म, विष्णू आणि महेश हे त्रिदेव माता अनुसया आणि अत्री ऋषींवर अतिशय प्रसन्न झाले आणि काहीतरी वर मागा अशी विनंती केली, त्यावर त्या दोघांनी त्रिदेवांना विनंती केली की आपण इथेच राहावे यावर श्री विष्णू दत्त अवताराने त्त्यांच्याजवळ राहिले, श्री शिव दुर्वास आणि ब्रह्मदेव चंद्र म्हणून त्याचे पुत्र झाले.

    दत्तगुरूंचे २४ गुरु कोणते?

    गुरु दत्तात्रय हे त्रिमूर्तीचा अवतार असून देखील त्यांनी २४ गुरु मानले आहेत. ते खालील प्रमाणे…

    1. पृथ्वी
    2. वायू
    3. आकाश
    4. अग्नी
    5. जल
    6. चंद्र
    7. सूर्य
    8. कबुतर
    9. अजगर
    10. समुद्र
    11. पतंग
    12. माशी
    13. हत्ती
    14. भ्रमर
    15. हरीण
    16. मासा
    17. पिंगला
    18. टिटवा
    19. लहान मुल
    20. कुमारीकन्या
    21. शरकर्ता
    22. सर्प
    23. कोळी
    24. आळी

    या प्रत्येकामधील एका विशिष्ट गुणामुळे दत्तगुरूंनी त्यांना आपले गुरु मानले.

    हे सुद्धा वाचा;-

    Related Articles

    sant tukaram maharaj
    EventsCultural India

    संत तुकाराम महाराज: जीवन, कार्य आणि अध्यात्मिक योगदान

    महाराष्ट्राच्या संत परंपरेत संत तुकाराम महाराजांचे नाव सर्वोच्च मानले जाते. वारकरी संप्रदायातील...

    मार्गशीर्ष गुरुवर महिती
    Cultural IndiaEvents

    मार्गशीर्ष गुरुवार माहिती – पूजा, विधी, कथा, नियम, फायदे

    भारताची अध्यात्मिक परंपरा, भक्तीभाव, ऋषी-मुनींचे उपदेश आणि ऋतूंचे बदल यांच्यातून उपासनेचे अनेक...

    Saint Dnyaneshwar Maharaj
    Cultural IndiaEvents

    माऊली संत ज्ञानेश्वर महाराज माहिती | Saint Dnyaneshwar Maharaj Information

    महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे स्थान अत्यंत उंच...

    bhagavad gita jayanti
    Cultural IndiaEvents

    गीता जयंती माहिती (Gita Jayanti)| श्रीमद् भगवद् गीता

    गीता जयंती हा दिवस भारतातील तसेच जगभरातील हिंदू भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि...